मुलाच्या विरोधात वडिलांकडून चोरीची तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाच्या विरोधात वडिलांकडून चोरीची तक्रार दाखल
मुलाच्या विरोधात वडिलांकडून चोरीची तक्रार दाखल

मुलाच्या विरोधात वडिलांकडून चोरीची तक्रार दाखल

sakal_logo
By

चाकण, ता. २२ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे राहत्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची व रोख रकमेची मुलानेच चोरी केल्याची तक्रार वडिलांनी पोलिसांत दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. निखिल संतोष सालके (वय -१९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील संतोष हनुमंत सालके (वय ४८) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हा प्रकार तेरा ते अठरा तारखेच्या दरम्यान घडला. संशयित आरोपी निखिल याने कपाटाच्या लॉकरचा पाठीमागील पत्रा स्क्रू ड्रायव्हरने तोडून कपाटातील सहा तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.