Thur, June 1, 2023

देशमुखवाडी येथे आढळला
अनोळखी पुरुषाचा मृतदेह
देशमुखवाडी येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
Published on : 13 February 2023, 1:39 am
चाकण, ता. १३ : देशमुखवाडी (ता. खेड) येथे ओढ्यात टाकलेला एका ४० ते ४२ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. डोक्यात व छातीवर मारहाण करून खून केला असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओढ्यात टाकण्यात आला होता.
ही घटना आठवड्याभरापूर्वी घडलेली आहे. मृतदेह कुजला होता. शेळ्या चारणाऱ्याने गावच्या सरपंचाला ही माहिती दिली. त्यानंतर सरपंचाने पोलिसांना ही माहिती दिली. मृतदेहाचा काही भाग जंगली प्राण्यांनी खाल्लेला होता. अंगावर कपडे नव्हती. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या डोक्यात व छातीवर मारहाण करून मृत्यू झाल्याचे सांगितले. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसल्याचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व सहायक पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण यांनी दिली.