Sat, June 10, 2023

पत्नीची पतीविरुद्ध
पोलिसांत तक्रार
पत्नीची पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार
Published on : 13 February 2023, 3:03 am
चाकण, ता. १३ : पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद चाकण-आगरवाडी (ता. खेड) येथील एका विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने नकार दिल्यानंतरही पतीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन व मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. याप्रकरणी पतीला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रियांका साळुंखे यांनी दिली.