
श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या चाकण शाखेचे आज उद्घाटन
चाकण, ता. १५ : लांडेवाडी-चिंचोडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चाकण (ता. खेड) शाखेचे उद्घाटन गुरुवारी (ता. १६) सायंकाळी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी दिली.
संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या भैरवनाथ पतसंस्थेच्या मुख्यालयासह पंधरा शाखा सध्या कार्यरत असून, त्या संपूर्ण संगणकीकृत आहेत. संस्थेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत संस्थेचे ऑनलाइन ॲप तसेच क्यूआर कोडची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. संस्थेकडे आजअखेर ३६५ कोटींच्या ठेवी असून, २८० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेला स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे, अशी माहिती सागर काजळे यांनी दिली.