
चक्रेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
चाकण, ता. १८ : येथील पुरातन चक्रेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती, असे चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. राम कांडगे यांनी सांगितले.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर डामसे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे तसेच पोलिस कर्मचारी गर्दीवर तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवत होते. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, कार्यकर्त्या सहकार्य करत होते. देवस्थानच्या वतीने महापूजा झाल्यानंतर दर्शनबारी खुली करण्यात आली. शिवलिंगाची आकर्षक फुलांनी सजावट केली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कांडगे, किरण मांजरे, गोपाळशेठ जगनाडे, शिवाजी जाधव, अनिल देशमुख, राजेंद्र शिंदे, तुषार मांजरे इतर व्यवस्था पाहत होते.
जय भोले अमरनाथ सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने भाविकांना खिचडी तसेच चहाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती रामदास धनवटे यांनी दिली. या वाटपावेळी पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, किरण गवारे, सुभाष मांडेकर, रामचंद्र कड, अशोक सोनवणे, दत्ता आढाव, ज्ञानेश्वर घाटे, अशोक सोनवणे, स्वामी कानपिळे, दत्ता जाधव, कैलास जाधव, मयूर खांडेभराड, ज्ञानेश्वर कड आदी उपस्थित होते. प्रकाश भुजबळ यांनी बोल्हाई माता मंदिर परिसरात भाविकांसाठी खिचडी वाटप केले.