Sun, May 28, 2023

टेम्पो उलटल्याने
वाकी येथे कोंडी
टेम्पो उलटल्याने वाकी येथे कोंडी
Published on : 21 February 2023, 5:09 am
चाकण, ता. २१ : वाकी खुर्द (ता. खेड) येथे बिरदवडी फाट्याजवळ पुणे-नाशिक महामार्गावर रात्री नऊच्या सुमारास नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर मालवाहू टेम्पो उलटला. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिस कर्मचारी तेथे गेले. टेम्पो क्रेनने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुमारे एक तासाने पूर्ववत झाली. टेम्पो उलटल्यावर चालक मात्र पळून गेला, अशी माहिती चाकण वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर डामसे यांनी दिली.