Fri, June 9, 2023

सावरदरी येथील कंपनीतून
तीन लाखांच्या मालाची चोरी
सावरदरी येथील कंपनीतून तीन लाखांच्या मालाची चोरी
Published on : 25 February 2023, 3:27 am
चाकण, ता. २५ : सावरदरी (ता. खेड) येथील मेगाइ पी सी प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील सुमारे पंधराशे किलो वजनाचे एकूण तीन लाख रुपये किमतीचे तीस जॉब चोरट्यांनी चोरून नेले. याबाबतची फिर्याद ऐनुल हबीब हारूण इनामदार (वय ३६, रा. चिंचवड) यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.