पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वाकी येथे दुचाकीस्वारास लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने
वाकी येथे दुचाकीस्वारास लुटले
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वाकी येथे दुचाकीस्वारास लुटले

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वाकी येथे दुचाकीस्वारास लुटले

sakal_logo
By

चाकण, ता. २७ : संतोषनगर-वाकी (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून घरी चाललेल्या एकाला चार जणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याजवळील तीस हजार सातशे रुपये रोख रक्कम, कागदपत्रे, एटीएम कार्ड घेऊन त्याला मारहाण करून लुटले.
या प्रकरणी प्रवीण ज्ञानेश्वर सांडभोर (वय ४७, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली की, फिर्यादी सांडभोर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हे पुणे येथून दुचाकीवरून घरी राजगुरुनगर येथे चालले होते. संतोषनगर-वाकी (ता. खेड) येथील ‘समाधान’ हॉटेलपासून काही अंतरावर सांडभोर यांना चौघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अंधारात नेले. तेथे त्यांच्याकडील रोख तीस हजार सातशे रुपये व पाकिटातील आधार कार्ड, वाहनपरवाना, पॅन कार्ड व बँकेचे दोन एटीएम कार्ड काढून घेतले. तसेच, हातापायाने मारहाण केली व चौघे काळ्या रंगाच्या एका पल्सरवरून व दुसऱ्या एका, अशा दोन दुचाकीवरून राजगुरुनगरच्या बाजूने निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.