चाकण-राक्षेवाडी येथे शेतीच्या वादातून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण-राक्षेवाडी येथे 
शेतीच्या वादातून मारहाण
चाकण-राक्षेवाडी येथे शेतीच्या वादातून मारहाण

चाकण-राक्षेवाडी येथे शेतीच्या वादातून मारहाण

sakal_logo
By

चाकण, ता. २८ : चाकण-राक्षेवाडी (ता. खेड) येथे शेतीच्या वादावरून सोमवारी (ता. २७) सकाळी सातच्या सुमारास झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर चाकण पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली की, याप्रकरणी सत्यवान ज्ञानोबा राक्षे, संतोष बाळू राक्षे, बाळू नामदेव राक्षे, सुभाष ज्ञानोबा राक्षे, किरण दिलीप कौटकर आणि पाच महिला आरोपी, अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चाकणची राक्षेवाडी येथील शेतजमिनीत घडला. आरोपी सत्यवान व संतोष हे दोघे शेतातील मका आणि हत्ती गवत ट्रॅक्टरने रोटारून टाकत असताना फिर्यादी महिला व त्यांचे पती मुलगा व मुलगी हे मका पिकाचे नुकसान करण्यापासून त्यांना अडवत होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपींनी फिर्यादी व मुलगा विशाल यास लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यामध्ये फिर्यादी महिलेला दोन्ही हाताला जखमा झाल्या असून, मुलाला किरकोळ खरचटले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.