Fri, June 9, 2023

महाळुंगे येथे एकाला
गांजा विक्रीप्रकरणी अटक
महाळुंगे येथे एकाला गांजा विक्रीप्रकरणी अटक
Published on : 28 February 2023, 2:11 am
चाकण, ता. २८ : महाळुंगे (ता. खेड) येथे तळेगाव- चाकण रस्त्यावर एका कंपनीच्या गेटसमोर सोमवारी (ता. २७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास गांज विक्री करणाऱ्यास अटक केली. कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय ३३, रा. महाळुंगे), असे त्याचे नाव आहे. तो तीन किलो वजनाचा सुमारे ७५ हजार १५० रुपये किमतीचा गांजा विक्री करताना आढळला. त्याने नितीन भोपळे (वय ३२, रा. मादलमोई, गेवराई, जि. बीड) याच्याकडून गांजा आणला होता. याप्रकरणी पोलिस शिपाई अशोक गारगोटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.