Tue, June 6, 2023

कुरुळी येथील कंपनीच्या मालाचा अपहार
कुरुळी येथील कंपनीच्या मालाचा अपहार
Published on : 2 March 2023, 2:53 am
चाकण, ता. २ : कुरुळी (ता. खेड) येथील ‘शुभम फ्राईड कॅरिअर इंडिया प्रा. लि. ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या लोखंडी पॅलेटचा सुमारे ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी मालवाहू वाहन चालक आरोपी जलालुद्दीन इब्राहिम सय्यद, उत्तम गणपत शिनगरे, मुनीर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या तिघांना अटक केली आहे.
याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी माहिती दिली की, आरोपी हे या कंपनीमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एकूण ७५ हजार सहाशे रुपये किमतीच्या मालाचा अपहार केला. आरोपींनी त्यांच्या ताब्यात विश्वासाने दिलेले लोखंडी पॅलेट कंपनीत खाली करणे आवश्यक असताना त्याचा अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची फिर्याद राकेश कदम (वय ३६, रा. काळेवाडी, ता. हवेली) यांनी दिली.