
भांबोली येथे नऊ जणांवर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
चाकण, ता. २ : भांबोली (ता. खेड) येथील जमिनीच्या वादातून कंपाउंड तोडून शिवीगाळ करून ‘पाच लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या जिवाचे बरे वाईट करू,’ अशी धमकी दिल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद सचिन संतराम नाईकनवरे (वय ३७, रा. वराळे, ता. खेड) यांनी पोलिसात दिल्यानंतर संजय कचरू नवरे, अनिल कचरू नवरे, सुनील कचरू नवरे, गणेश मनोहर भोंडवे, अक्षय संजय नवरे, ओंकार अनिल नवरे, तसेच तीन महिला आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड यांनी माहिती दिली की, फिर्यादी व त्यांचे कामगार हे तारेच्या कंपाउंडच्या आत काम करत असताना आरोपी यांनी अनधिकाराने फिर्यादीच्या ताब्यात व फिर्यादीकडे कुलमुखत्यार असलेल्या जागेच्या आत दगड व लाकडी दांडके घेऊन येऊन हाताने व पायाने कंपाउंड तोडून नुकसान केले. फिर्यादीला व सोबत असलेल्या एका व्यक्तीला, ‘आत्ताच्या आत्ता पाच लाख रुपये द्या. नाहीतर तुमच्या जिवाचे आम्ही बरे वाईट करू,’ अशी धमकी देऊ लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे.