
मोई येथील गुन्हेगार एका वर्ष स्थानबद्ध
चाकण, ता. ३ : मोई-फलकेवस्ती (ता. खेड) येथील एका गुन्हेगाराला वेळोवेळी समज देऊनही अवैध धंदे बंद करत नसल्याने महाळुंगे पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. सुकदेव महिंद्रसिंग राठोड (वय २४), असे त्यांचे नाव आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
राठोड याच्यावर सन २०१८ पासून चाकण, आळंदी व महाळुंगे पोलिस ठाण्यामध्ये वेळोवेळी हातभट्टीची दारू विक्रीचे नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत असताना कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्याकरिता प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर त्याच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही. त्याच्या या कृतीला प्रतिबंध बसावा यासाठी महाळुंगे पोलिसांनी त्याच्यावर एक वर्ष स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे. त्याला येरवडा कारागृहात एका वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे.