सुवर्णा कोलते यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सुवर्णा कोलते यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार
चाकण, ता.१३ : चाकणची नाणेकरवाडी (ता.खेड) येथील संतभारती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सुवर्णा प्रवीण कोलते यांना पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचा ''आदर्श ग्रंथपाल पुरस्कार २०२३’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सासवडमध्ये येथे नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त ग्रंथालय अधिवेशनात पुणे जिल्हा व पुणे विभागीय ग्रंथालय संघातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, अधिवेशन समितीचे अध्यक्ष अरुण दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचे संस्थापक, अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. नाणेकरवाडी येथे १९९९ मध्ये स्थापन झालेले हे या परिसरातील जुने शासनमान्य मुक्तद्वार वाचनालय आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून सफाई कामगार महिलांचा सन्मान, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन मेळावा, महिला बचत गटांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी रोजगार व प्रशिक्षण, कार्यशाळा, एक किंवा दोन मुली असणाऱ्या दांपत्यांना सावित्रीबाई फुले कन्यारत्न पुरस्काराने गौरव, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, विद्यार्थी दत्तक योजना, वृक्षारोपण, ग्रंथप्रदर्शन, वाढदिवसानिमित्त झाडे व पुस्तकभेट योजना, वक्तृत्व स्पर्धा, निबंध व काव्य लेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कोरोना काळात गरजूंना किराणा वाटप, डॉक्टरांचा सन्मान, बाल साहित्य प्रदर्शन आदी उपक्रम राबविले आहेत, अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष देवकर यांनी दिली.
05142
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.