चाकण नागरी पतसंस्थेचा 
निवडणूक कार्यक्रम जाहीर

चाकण नागरी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

चाकण, ता. १२ : चाकण (ता. खेड) येथील चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १३ ते १७ मार्च या कालावधीत नामनिर्देशन पत्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मतदान येत्या १६ एप्रिलला होणार आहे, अशी माहिती तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्‍चंद्र कांबळे व पतसंस्थेचे सचिव अनिल धाडगे यांनी दिली.
या पतसंस्थेचे सुमारे २८९९ मतदार असून, १३ संचालक आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण जागा आठ, अनुसूचित जाती, जमाती एक, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय एक, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग एक, अशा १३ जागांसाठी मतदान होणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांना निवडणूक पात्रता ठेव म्हणून २५ हजार रुपये ठेव संस्थेत ठेवावी लागणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, महिला यांना अडीच हजार रुपये ठेव ठेवावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com