Wed, May 31, 2023

अल्पवयीन मुलीवर
कुरुळीत अत्याचार
अल्पवयीन मुलीवर कुरुळीत अत्याचार
Published on : 14 March 2023, 1:23 am
चाकण, ता. १४ : कुरुळी (ता. खेड) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आकाश गणेश वाकडे(वय २४, रा. कुरळी) याच्यावर गुन्हा दाखल काल आहे.
आरोपी वाकडे याने अल्पवयीन पीडितेशी वेळोवेळी जवळीक वाढवली. तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले व तिला गर्भवती ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याला अजून अटक केलेली नाही, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका साळुंखे यांनी दिली.