चाकण बाजारात कोथिंबीर मातीमोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण बाजारात कोथिंबीर मातीमोल
चाकण बाजारात कोथिंबीर मातीमोल

चाकण बाजारात कोथिंबीर मातीमोल

sakal_logo
By

चाकण, ता.१६: येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख जुड्यांची आवक झाली. जुडीला केवळ एक रुपया बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, अशी माहिती व्यापारी कुमार गोरे तसेच बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

चाकण येथील बाजारात कोथिंबिरीला गेल्या दोन महिन्यापासून पाच, दहा रुपये एका जुडीला भाव होता. सध्या जुड्यांची मोठी आवक होत असल्याने बाजारभाव दिवसेंदिवस कोसळत आहेत. एक रुपया भाव मिळाल्याने कोथिंबीर मातीमोल बाजारभावाने विकली गेली. कोथिंबिरीचे ढीग बाजारात विक्रीविना तसेच पडून आहेत. कोथिंबीर ''फुकट घेऊन जा'' अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे, असे आबा गोरे, रवींद्र बोराटे यांनी ''सकाळ''ला सांगितले.

कोथिंबिरीस २०२२ मध्ये मिळालेला भाव
ऑगस्ट .......२० रुपये
सप्टेंबर....३० रुपये
ऑक्टोंबर....३५ रुपये
नोव्हेंबर, डिसेंबर .....१० रुपये


कोथिंबिरीचा बाजारभाव जानेवारी २०२३ पासून पाच, दहा रुपये मिळत आहे. मेथीच्या एका जुडीला भाव मात्र सध्या प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये राहिले.हे भाव महात्मा फुले घाऊक बाजारातील आहेत. घाऊक बाजारात मेथी कोथिंबिरीची जुडी अगदी कमी एक ते पाच रुपयात मिळत आहे. तर किरकोळ बाजारात मात्र मेथी तसेच कोथिंबिरीची एक जुडी पाच ते दहा रुपयांनी विकली जात आहेत.
- बाळासाहेब धंद्रे, सचिव, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे

05156