चाकण येथील बाजारामध्ये २४ हजार कांदा पिशव्यांची आवक

चाकण येथील बाजारामध्ये २४ हजार कांदा पिशव्यांची आवक

चाकण, ता.१६ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात कांद्याची सुमारे २४ हजार ५०० पिशव्यांची आवक झाली. त्यास किमान आठ ते कमाल १३ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
राज्यात कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गोरे, निर्यातदार प्रशांत गोरे पाटील, कांदा व्यापारी माणिक गोरे, जमीरभाई काझी, बाळासाहेब गायकवाड, विक्रम शिंदे, प्रकाश भुजबळ व इतरांनी केली आहे. हा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही. सरकारने शेतकऱ्याला कांद्याला प्रति किलोला किमान वीस रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी, व्यापाऱ्यांची असल्याचे बाजार समितीचे संचालक राम गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी बाजारात कांद्याच्या पिशव्या प्लास्टिक कागदाने तसेच ताडपत्रीने झाकलेला आहेत.

05158

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com