चाकण येथे शिबिरात २८१ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथे शिबिरात 
२८१ जणांचे रक्तदान
चाकण येथे शिबिरात २८१ जणांचे रक्तदान

चाकण येथे शिबिरात २८१ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

चाकण, ता. १६ : येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २८१ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण रक्तपेढीच्या डॉ. मोसलगी यांच्या पथकाने रक्त संकलन केले.
या शिबिराचे उद्‍घाटन ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. या शिबिराला किरण मांजरे, कालिदास वाडेकर, नितीन गोरे, अंगद जाधव तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांनी योगदान दिले. मधुकर गोसावी यांनी आभार मानले.
यावेळी मांजरे व वाडेकर म्हणाले, ‘‘निरंकारी भक्तगण चाकण परिसरामध्ये विविध माध्यमातून ज्या सेवा देत आहेत, हे एक परोपकाराचे काम आहे. समाजामध्ये लोप पावलेली मानवतेची भावना मिशनचे सेवादार आपल्या सेवेद्वारे जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’