रक्तदान शिबिराला चाकणमध्ये प्रतिसाद

रक्तदान शिबिराला चाकणमध्ये प्रतिसाद

चाकण, ता. १७ : येथील सचिन किरण मांजरे मित्र मंडळ व चाकण ब्लड बँकेच्यावतीने फोकस फिटनेस जीम या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिमचे सभासद व सचिन मांजरे मित्र मंडळातील सुमारे ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र व फळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सचिन मांजरे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे यांनी सांगितले की, कोरोना काळात रक्तदानाला विशेष महत्त्व आले.
अपघातग्रस्त, रुग्ण यांचे जीव वाचविण्यासाठी रक्तदात्यांची खूप गरज असल्याने हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

याप्रसंगी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल तांबे, शिवसेनेचे नेते नितीन गोरे, भाजपचे नेते राजनभाई परदेशी, मनोज मांजरे, कालिदास वाडेकर, धीरज मुटके, लक्ष्मण जाधव, भरत कानपिळे, नीलेश टिळेकर, मनीष गुगळे, अप्पा पोतेकर, मच्छिंद्र गोरे, दत्ता गोरे, विजय शिंदे, प्रकाश वाडेकर, महेश शेवकरी, हनुमंत मेदनकर, रोहन कांडगे, किशोर जगनाडे, मंदार परदेशी, सचिन परदेशी, सागर आंद्रे, राजू नाणेकर, मारुती आंद्रे, राजू झांबरे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान केले. सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com