तरंगत्या तराफ्यामुळे वाचणार शेतकऱ्यांचे प्राण

तरंगत्या तराफ्यामुळे वाचणार शेतकऱ्यांचे प्राण

चाकण, ता. २७ : मरकळ (ता. खेड) येथील शेतकरी रमेश गोडसे यांनी नदीच्या पाण्यामध्ये जे कृषी पंप बसविले जातात. त्या पंपात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक बसतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. तसेच पुराच्या पाण्यातही विद्युत पंप वाहून जातात.अशा घटना रोखण्यासाठी गोडसे यांनी सलग चार वर्षे संशोधन करून मँगो फ्लोटर्सचा एक तरंगता तराफा बनवलेला आहे. तो जीवन सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यास देशभरातील शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.

विद्युत पंप, पाणबुडी (सब मर्सिबल पंप), विहीर आदींसाठी मॅंगो फ्लोटर उपयुक्त ठरत आहे. मॅंगो फ्लोटरची उत्पादनास कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आदी राज्यातील शेतकरी मागणी करत आहेत, असे गोडसे यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. त्यांनी शेतीला प्राधान्य देत बजाज ऑटो कंपनीमध्ये सेवा केली. शेती करत असताना नदीच्या पाण्यात प्रवाह उतरल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी अभ्यास तसेच अनेक प्रयोग करून मँगो फ्लोटरचा तराफा बनविला.


नदी, तलाव, विहिरी, तळ्याच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात. यावर मात करण्यासाठी मी सलग चार वर्षे संशोधन केले व मँगो फ्लोटर बनविला. मँगो फ्लोटरला पाणबुडी पंप जोडल्याने त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला तरी शेतकऱ्यांना मँगो फ्लोटर मुळे इजा होत नाही. मॅंगो फ्लोटरला उन्हाचा, पाण्याचा परिणाम होत नाही. वजनाने तो हलका आणि मजबूत आहे. तो हाताळण्यासाठी सोपा आहे.
- रमेश गोडसे, शेतकरी उद्योजक


असा होतो फायदा
१. जलदपणे मोटर पंप बसवण्यासाठी सोपा.
२. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात नाही
३. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत नाही.
४. विद्युत पंप जळत नाही, चिखलात रुतच नाही.


शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
रमेश गोडसे यांनी त्यांच्या घराशेजारीच तराफा बनविण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी किरण, अतुल हे दोघे मुले सांभाळतात. गोडसे यांना दिल्ली व राज्यात अनेक ठिकाणी या उत्पादनाबाबत पारितोषिके मिळाली आहेत. लक्ष्मी नारायण इंडस्ट्रीज या नावाने सध्या त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी बनविलेल्या मॅंगो फ्लोटरमुळे अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहेत.

05176, 05175

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com