चाकण वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण वाहतूक विभागातील
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
चाकण वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

चाकण वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By

चाकण, ता. २१ : चाकण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर डामसे यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली केली आहे. महाळुंगे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांची चाकण वाहतूक विभागात, तसेच चाकण वाहतूक विभागातील सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांची महाळुंगे वाहतूक विभागात बदली केली आहे. ढामसे यांची पाच महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. त्यांची अचानक बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
चाकण वाहतूक विभागाच्या अंतर्गत पूर्वी महाळुंगे वाहतूक विभाग होता. परंतु, चाकण वाहतूक विभाग तसेच महाळुंगे वाहतूक विभाग स्वतंत्र केलेले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. अवजड वाहने तसेच इतर वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी सातत्याने होत असते. वाहतूक कोंडीत अगदी मंत्री व उद्योजक अडकतात. मात्र, वाहतूक कोंडी काही सुटत नाही. कोंडी सोडविण्यासाठी शासनाने या मार्गांची कामे करावी व वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांची आहे. पुणे-नाशिक, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव, चाकण-आंबेठाण या मार्गावर अवैध वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीचा प्रश्‍नही मोठा आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांची म्हणणे आहे.