
रासे येथील तरुणाची आत्महत्या
चाकण, ता. २५ : रासे (ता. खेड) येथील एका तरुणाने शनिवारी (ता. २५) सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीतील एका झाडाला दोर अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. नवनाथ दत्तात्रेय वाडेकर (वय ३२) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
नवनाथ हा तीन-चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याबाबत पोलिसात फिर्याद दिली होती. शनिवारी सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीतील एका दुकानासमोरील झाडाला दोरी अडकवून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला, असे संबंधित डॉक्टरांनी स्पष्ट केले. तो अविवाहित होता. त्याच्यामागे एक भाऊ व परिवार आहे. पाच -सहा वर्षांपूर्वी त्याने आत्महत्येचा प्रयत्न त्याच परिसरात केला होता. त्यावेळी तो वाचला होता.