वाकी येथे मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

वाकी येथे मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

चाकण, ता. २९ : पुणे -नाशिक महामार्गावर वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत पीएमपीएमएल बस चालक व प्रवाशांना दमदाटी करून एकाला मारहाण केली. याप्रकरणी एका मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद अमित सत्यवान हाडवळे (वय-३६ रा. राजुरी,आळेफाटा ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी बुधवारी (ता.२९) दिली आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिली.
बस स्टॉपवर वाकी फाटा येथे पीएमपीएमएल बस प्रवासी सोडविण्यासाठी थांबविली असताना कार चालक आरोपी याने त्याची गाडी बस चालकाच्या उजव्या बाजूस थांबवून बसचालक कदम याला, ''तू मध्येच का थांबला'' असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. फिर्यादी हाडवळे बसमधून उतरून काय झाले पाहण्यासाठी बससमोर गेला असता आरोपीने त्याच्या गाडीतील लोखंडी टॉमी व पान्हा हातात घेऊन फिर्यादीच्या डाव्या पायावर,पाठीवर मारहाण करून जखमी केले. तसेच पीएमपीएमएलचे कर्मचारी व इतरांना वाईट शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com