कुरुळी येथील कंपनीतून ५ लाखांचे साहित्य चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुळी येथील कंपनीतून
५ लाखांचे साहित्य चोरी
कुरुळी येथील कंपनीतून ५ लाखांचे साहित्य चोरी

कुरुळी येथील कंपनीतून ५ लाखांचे साहित्य चोरी

sakal_logo
By

चाकण, ता. ११ : कुरुळी (ता. खेड) येथील वी.सी. सप्लाय चेन सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीमधील सुमारे ५ लाख १९ हजार २७८ रुपये किमतीचा माल गुरुवारी (ता. ६) चोरट्याने चोरून नेला.
याबाबत कल्पेश रणजित सिंह वेद (वय ५३, रा. वाकड, पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने ही चोरी केली. या प्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या गोदामाच्या मागच्या बाजूच्या खिडकीच्या काचा तोडून गज कापून चोरट्याने आत प्रवेश केला. तेथून एलईडी टीव्ही, लॅपटॉप व इतर साहित्य, असा सुमारे ५ लाख १९ हजार २७८ रुपये किमतीचा माल चोरी केला, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर व पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिली.