चाकण नागरी पतसंस्थेवर श्री चक्रेश्वर पॅनेलचे वर्चस्व

चाकण नागरी पतसंस्थेवर 
श्री चक्रेश्वर पॅनेलचे वर्चस्व

चाकण, ता. १७ : येथील चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री चक्रेश्वर सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले.
चाकण नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत श्री चक्रेश्वर सहकार पॅनेलचे नितीन गोरे व राहुल परदेशी हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर, उर्वरित ११ संचालक निवडणुकीत विजयी झाले. विरोधी श्री भैरवनाथ महापरिवर्तन पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. पतसंस्थेवर माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे चुलत बंधू व संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक नितीन गोरे यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आहे. तर, श्री भैरवनाथ महापरिवर्तन पॅनेलचे उमेदवार व चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राम गोरे, मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
श्री चक्रेश्वर सहकार पॅनेलचे गोरक्षनाथ कांडगे, सुरेश कांडगे, गिरीश गोरे, नीलेश टिळेकर, सुनील नायकवाडी, अशोक बिरदवडे, लक्ष्मण वाघ, नवनाथ शेवकरी आदी सर्वसाधारण गटातील उमेदवार विजयी झाले आहेत. तर, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून बाळासाहेब साळुंके, महिला गटातून प्राजक्ता गोरे व साधना गोरे हे विजयी झाले. सुमारे २४५१ मतदार सभासदांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिश्चंद्र कांबळे, सहायक निवडणूक अधिकारी व संस्थेचे सचिव अनिल धाडगे यांनी काम पहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com