कुरुळीत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

कुरुळीत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

चाकण, ता. २० : कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीवर अतुल देवराव राठोड (सध्या रा. सोनवणे वस्ती, कुरुळी) याने जबरदस्तीने अतिप्रसंग केला. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपी राठोड याच्यावर लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. पीडित अल्पवयीन तरुणीच्या शेजारी फिर्यादी राहतो. फिर्यादी तरुणी त्याच्या खोलीजवळून चॉकलेट आणण्यासाठी जात असताना जबरदस्तीने फिर्यादीचा हात पकडून फिर्यादी तरुणीस त्याने खोलीमध्ये ओढले. फिर्यादी तरुणी ओरडू लागल्याने फिर्यादीच्या नाकातोंडाजवळ कोणते तरी बेशुद्धीचे औषध लावलेला रुमाल लावून फिर्यादीला बेशुद्ध करून अतिप्रसंग करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले, अशी माहिती महिला पोलिस उपनिरीक्षक भंडरवाड त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com