चाकणच्या बाजारात मिरची कडाडली

चाकणच्या बाजारात मिरची कडाडली

चाकण, ता. २३ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात दिल्ली, बीड, नागपूर, नाशिक, जिल्ह्यातून तसेच गुजरातहून आज (ता. २३) सुमारे वीस टन हिरव्या मिरचीची आवक झाली. बीड येथून ज्वाला मिरचीची पाच टनावर आवक झाली. यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत वीस, पंचवीस रुपयांनी प्रति किलोला वाढ आहेत. हिरव्या मिरचीला प्रति किलोला पन्नास रुपये भाव आज मिळाला, अशी माहिती व्यापारी रवींद्र बोराटे, आबा गोरे यांनी सांगितली.


चाकण बाजारात परराज्यातून फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथील बाजारात नाशिक, नगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे वीस टनावर आवक होत आहे. टोमॅटोला बाजार प्रति किलोला सध्या फक्त १५ ते वीस रुपये भाव मिळत आहे. फ्लॉवर दहा, पंधरा रुपये किलोने बाजारात विकली जात आहे. कोबीचे दर घसरले आहेत. नगर जिल्ह्यातून हिरव्या वाटाण्याची आवक सुमारे दोन टनावर झाली. हिरव्या वाटण्याला भाव प्रति किलोला ८० रुपये मिळाला. मिरचीची मागणी वाढते आहे त्यामुळे मिरचीचे भाव पुढील काळात ८० ते १०० रुपये प्रति किलोला घाऊक बाजारात जातील अशी शक्यता आहे. उन्हामुळे खरेदीदारांची संख्या बाजारात घटली तरी मागणी मोठी असल्याने भाव वाढत आहे, व्यापारी चांगदेव बोराटे, अनिकेत बोराटे, संजय वहिले यांनी सांगितले.

सर्वसामान्य ग्राहकांना फटका
मिरची बाजारात सध्या पन्नास रुपये किलोने विकली जात आहे. मात्र तिची विक्री किरकोळ बाजारात अगदी शंभर रुपये प्रति किलाने होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा फटका बसत आहे. स्थानिक भागातून तसेच पर जिल्ह्यातून आलेल्या पिवळ्या मिरचीला ही पन्नास रुपये भाव मिळाला.


05317

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com