suicide
suicidesakal

PMP Driver : अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पीएमपी बसचालकाची आत्महत्या

पीएमपीएमएलच्या एका कंत्राटी बस चालकाने राहत्या घरात पंख्याला दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली.
Summary

पीएमपीएमएलच्या एका कंत्राटी बस चालकाने राहत्या घरात पंख्याला दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली.

चाकण - वाकी बुद्रुक-संतोषनगर (ता. खेड) येथे पीएमपीएमएलच्या एका कंत्राटी बस चालकाने राहत्या घरात पंख्याला दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. विलास बुळे, असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश सावंत, अण्णा सावंत (पत्ता माहीत नाही), परदेशी (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती विलास बुळे हे भोसरी येथील पीएमपीएमएल बसवर कंत्राटी चालक म्हणून सुमारे आठ महिन्यांपासून नोकरी करत होते. मात्र, नोकरी लागल्यापासून त्यांना तेथील काही अधिकारी ड्यूटी देत नव्हते. त्यामुळे त्यांना पगार कमी मिळत होता. तसेच, संबंधित अधिकारी शिवीगाळ करून हाकलून देत होते. तेव्हापासून ते तणावाखाली होते.

दरम्यान, २० एप्रिल रोजी विलास यांनी पत्नीला फोन करून रडतरडत सांगितले की, ‘आरोपींनी मला ड्युटीमध्ये खूप त्रास दिला आहे व मला वेळोवेळी शिवीगाळ करत आहे. त्यामुळे मला त्यांचा त्रास सहन होत नाही. मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.’ तसेच, विलास यांनी भावालाही या त्रासाबाबत मोबाईलवर मेसेज केला होता. दरम्यान, २१ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास येथे त्यांनी घरी आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com