Thur, October 5, 2023

मेदनकरवाडी येथे सदनिकेतून
नऊ लाखांच्या ऐवजाची चोरी
मेदनकरवाडी येथे सदनिकेतून नऊ लाखांच्या ऐवजाची चोरी
Published on : 28 April 2023, 1:38 am
चाकण, ता. २८ : मेदनकरवाडी-बालाजीनगर (ता. खेड) येथील एका सदनिकेतून गुरुवारी (ता. २७) रात्री चोरट्याने नऊ लाख २४ हजार ९५१ रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
याबाबत सुरेश कानडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून लॉकरमधील १ लाख ८७ हजार ३३४ रुपये किमतीचे हातातील सोन्याचे ब्रेसलेट, ३७ हजार ६१७ रुपये किमतीची सोन्याची अंगठी, रोख रक्कम सात लाख रुपये, असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.