आमदार मोहिते यांना कात्रजचा घाट दाखवू

आमदार मोहिते यांना कात्रजचा घाट दाखवू

चाकण, ता. ३० : खेड तालुक्यात २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मोहिते यांच्या विरोधात एकच उमेदवार दिला होता. त्यावेळी त्यांना पराभूत केले होते. त्याच पद्धतीने सर्वपक्षीय एकत्रित होऊन त्यांच्या विरोधात एक उमेदवार २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत दिला जाईल व त्यांना कात्रजचा घाट दाखविला जाईल, असे सर्वपक्षीय पॅनेलचे प्रमुख भाजपचे अतुल देशमुख, ठाकरे गटाचे अमोल पवार, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, संजय घनवट, शिंदे गटाचे राजूशेठ जवळेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
चाकण (ता.खेड) येथे रविवारी (ता.३०) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वपक्षीय पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात झाला. बाजार समितीच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, या प्रश्नावर अतुल देशमुख यांनी सांगितले की, बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे चित्र समोर आले. ते परिवर्तनाच्या बाजूने आहे. आमदार मोहिते यांनी धनदांडग्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारांनी उमेदवारांकडे पैशाची अपेक्षा ठेवली. आमदारांना बाजार समितीच्या निवडणुकीत आर्थिक ताकदीचा उमेदवार का द्यावा लागतो? या निवडणुकीत आमदारांना मतदारांना पाकीट देऊन सामोरे जावे लागले. बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील सातकर गट बाजूला होता. तालुक्यात परिवर्तनाच्या बाजूने मतदान झाले आहे, असे सर्वपक्षीयांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

अशोक खांडेभराड यांनी सांगितले की, मी एका सभेत आमदार पराभूत होतील असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी काळजी घेतली आणि पैसे वाटले आणि एटिकेटीने पास झाले. अतुल देशमुख यांनी सांगितले की, सर्वपक्षीय पॅनेलने आमदार मोहिते यांना टार्गेट केले नाही. आमदारांना स्वतःनिवडून येण्याची अडचण निर्माण झाली. सर्वपक्षीय पॅनेल उभे करताना सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवले. आमदारांना त्यांच्या गावात बूथवर स्वतः थांबावे लागले.

"सर्वपक्षीय पॅनेलचे काही नेते मतदारांना पैसे वाटप करताना आमदार मोहिते यांना मात्र मत देऊ नका. असे सांगत होते याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रश्नावर अतुल देशमुख यांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते यांना कोणी टार्गेट केले नाही. बाजार समितीत मागील काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे. त्याची पोलखोल करणार आहे.

यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक विजय शिंदे, माणिक गोरे, महेंद्र गोरे, सागर मुऱ्हे, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, क्रांती सोमवंशी, संदीप भोमाळे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, रामहरी आवटे, लक्ष्मण जाधव, गोरख गवारे ,सुनील बोंबले आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी बाबाजी काळे, संदीप सोमवंशी, किरण गवारे, पांडुरंग गोरे, गणेश नाणेकर, पांडुरंग बनकर, महादेव लिंभोरे, रत्नमाला भुजबळ, चंदन मुऱ्हे, अनिकेत केदारी, स्वामी कानपिळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
05345

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com