चाकणला भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात

चाकणला भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात

चाकण, ता. ७ : येथील भैरवनाथ महाराजांचा उत्सव विविध कार्यक्रमांनी तसेच पालखी मिरवणुकीने उत्साहात पार पडला. तर पावसामुळे बैलगाडा शर्यत घाटात पाणी, चिखल झाल्यामुळे रद्द केल्याची माहिती भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसन गोरे, महेश शेवकरी, व्यंकटेश सोरटे यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील पुरातन ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांचा उत्सव साजरा झाला. या उत्सवानिमित्ताने शुक्रवारी (ता. ५) पहाटे पाच वाजता भैरवनाथ महाराजांची पूजा करण्यात आली. सकाळी नऊ ते अकरा वाजता हरतुरे व मांडव डहाळे मिरवणूक गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत काढण्यात आली. श्री भैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक वाजंत्री वाद्यांच्या गजरात भैरवनाथ महाराज की जय या नामघोषात सायंकाळी काढण्यात आली. भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात अनेक मान्यवर तसेच भाविकांनी गर्दी केली होती. भैरवनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट केली होती. भैरवनाथाला हारतुरे, नारळ अर्पण करून भाविक ग्रामदैवताचे दर्शन घेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com