कुरुळीत मजुराला पिस्तूल दाखवून लुटले

कुरुळीत मजुराला पिस्तूल दाखवून लुटले

चाकण, ता. ११ : कुरुळी (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गावर कारभारी हॉटेलजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका पादचारी मजुराला पिस्तूलाचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी सत्यम कड, विशाल प्रकाश वाणी, आदेश कड, विधीसंघर्षित बालक (चौघेही रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांना अटक केली आहे. तर, अनेक गुन्ह्यातील आरोपी सत्यम कड हा मात्र फरारी आहे. यातील विधी संघर्षित बालकाजवळ पिस्तूल सापडला असून, एका खुनाच्या गुन्ह्यातील तो आरोपी आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीतील कारभारी हॉटेल जवळ सोमवारी (ता. ८) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद जयराम मुंडा (वय २८, रा. कुरुळी, मूळ रा. झारखंड) यांनी पोलिसांत दिली. फिर्यादी मुंडा हा रस्त्याने पायी चालत असताना आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी फिर्यादीजवळ येऊन त्याच्याकडे तंबाखू मागण्याचा बहाणा केला. फिर्यादीने तंबाखू नाही,’ असे म्हणताना आरोपींनी फिर्यादी जवळ येऊन त्याचे दोन्ही हात पकडून त्याचे खिसे तपासले. फिर्यादीने त्यावेळी विरोध केला. त्यामुळे आरोपीने त्यांच्याजवळील लोखंडी पिस्तूल फिर्यादीच्या डोक्याजवळ लावून ‘चिल्लाना बंद कर, नहीं तो मार डालुंगा’ असे बोलून फिर्यादीस धमकावले. फिर्यादीच्या खिशातील ७०० रुपये किमतीचा मोबाईल व ४० रुपये रोख रक्कम, असे एकूण ७४० रुपये किमतीचा माल जबरदस्तीने त्याच्याकडून काढून घेतला. त्यानंतर तिघेजण दुचाकीवरून चाकण बाजूकडे पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com