Fri, Sept 22, 2023

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी
वराळे येथे एकाला अटक
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वराळे येथे एकाला अटक
Published on : 24 May 2023, 2:50 am
चाकण, ता. २४ : येथील औद्योगिक वसाहतीतील वराळे (ता. खेड) येथे कोरेगावला जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास एका तरुणाला विनापरवाना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे सुमारे पंचवीस हजार रुपयाचा देशी बनावटीचा पिस्तूल व एक जिवंत काडतूस, असा माल जप्त केला. या प्रकरणी आरोपी आकाश अण्णा भोकसे (वय २३, रा. कुरकुंडी, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई अमोल माटे यांनी फिर्याद दिली, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर व उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिली.