Mon, Sept 25, 2023

कंपनीतील मालाची
कामगाराकडून चोरी
कंपनीतील मालाची कामगाराकडून चोरी
Published on : 26 May 2023, 1:21 am
चाकण, ता. २६ : वासुली (ता. खेड) येथील ‘बोरा मोबिलिटी एलएलपी’ या कंपनीतील कामगाराला कंपनीतील तेरा लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. अतिराज ऊर्फ बबलू राम मधाळे (वय ३२, रा. निलंगा, लातूर), असे अटक केलेल्याचे नाव आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १९ मे ते २१ मेच्या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांत फिर्याद अभय यादवराव बनसोडे (वय २८, रा. कोयनानगर, ता. हवेली) यांनी दिली. फिर्यादी यांच्या कंपनीतील कामगार मधाळे याने १३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे १३१ टार्गेट पार्ट चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.