Wed, Sept 27, 2023

चाकण परिसरात
पावसाची हजेरी
चाकण परिसरात पावसाची हजेरी
Published on : 29 May 2023, 1:08 am
चाकण, ता. २९ : खेड तालुक्यातील चाकण व परिसरात सोमवारी (ता. २९) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या पावसाने पथारीवाले तसेच हातगाडीवाले, नागरिक, पादचारी यांची पळापळ झाली. आणखी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरट केलेली आहे. त्या जमिनीला पूर्व मशागतीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. आज मोठ्या प्रमाणात उन्हाचा त्रास होत होता. दुपारी दोननंतर आकाशात ढग जमा झाले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. सहानंतर पुन्हा जोराने पाऊस सुरु झाला.