खेडच्या विकासाला अधिक महत्त्व : दिलीप मोहिते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडच्या विकासाला अधिक महत्त्व : दिलीप मोहिते
खेडच्या विकासाला अधिक महत्त्व : दिलीप मोहिते

खेडच्या विकासाला अधिक महत्त्व : दिलीप मोहिते

sakal_logo
By

चाकण, ता.३१ :'' मी सर्वसामान्य माणसाच्या कामाला, तालुक्याच्या विकासाला अधिक महत्त्व देतो. कुणाचाही फोन आला तरी कधीही फोन उचलतो. त्यामुळे लोक माझ्यावर प्रेम करतात,'' असे मत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.
चाकण (ता.खेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लावणी सम्राज्ञी संध्या पाटील व तिच्या सहकाऱ्यांनी लावणी सादर केली. आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. आमदार मोहिते बोलत होते. यावेळी आमदार मोहिते म्हणाले, खेड तालुक्यात कार्यकर्ते माझ्यावर मनापासून प्रेम करतात. सामान्य माणूसही माझ्यावर प्रेम करतो. माझ्या वाढदिवसालाही मोठी गर्दी होते. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मला सर्वसामान्य माणसाची नाळ माहीत आहे. मनोज खांडेभराड व इतरांनी माझ्या वाढदिवसानिमित्त तीन रुग्णवाहिका तालुक्यात दिल्या आहेत.
यावेळी प्रास्ताविकात भगवान मेदनकर यांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते हे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे कुटुंब प्रमुख आहे. २०२४ ला तालुक्याचे आमदार मोहिते हेच होणार आहेत. त्यांच्याच पाठीमागे तालुका उभा राहील.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी नगरसेवक जीवन सोनवणे, उद्योजक अनिकेत खालकर, सागर बनकर, राहुल नायकवाडी, राम गोरे, बाजार समिती संचालक महेंद्र गोरे, मनोज खांडेभराड, विशाल पऱ्हाड, बाबूभाई शेख, मुबीन काझी, बाप्पा जोगदंड, उल्हास मेदनकर, वामन गरुड आदी व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जीवन सोनवणे, सागर बनकर, राहुल नायकवाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


05447