''सिग्मा ''व सिंबायोसिस सेंटर''मध्ये उच्च व्यवस्थापन शिक्षणासाठी करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सिग्मा ''व सिंबायोसिस सेंटर''मध्ये उच्च व्यवस्थापन शिक्षणासाठी करार
''सिग्मा ''व सिंबायोसिस सेंटर''मध्ये उच्च व्यवस्थापन शिक्षणासाठी करार

''सिग्मा ''व सिंबायोसिस सेंटर''मध्ये उच्च व्यवस्थापन शिक्षणासाठी करार

sakal_logo
By

चाकण, ता.६ : येथील औद्योगिक वसाहतीतील सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड चाकण आणि सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग पुणे यांच्यामध्ये उच्च व्यवस्थापन शिक्षणासाठी कंपनीच्या लर्निंग सेंटरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच व्यवस्थापनाचे तंत्र वृधिंगंत करण्यासाठी सिंबायोसिस या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून पुणे आणि जयपूर येथील सुमारे ५० कर्मचारी उच्च शिक्षण घेणार आहेत, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन इनामदार यांनी दिली.
यावेळी सामंजस्य करारावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इनामदार व सिंबायोसिस फॉर डिस्टन्स लर्निंग या संस्थेच्या सोनाली कदम यांनी करारावर स्वाक्षरी केली. इनामदार यांनी या प्रसंगी शिक्षण घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. यावेळी कंपनीचे मुख्य मनुष्य बळ अधिकारी डॅनियल जॉन्सन, सिंबायोसिसचे मुख्य डायरेक्टर डॉ. स्वाती मजुमदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.


05478