Thur, Sept 21, 2023

नाणेकरवाडीत एकाला
पिस्तूलप्रकरणी अटक
नाणेकरवाडीत एकाला पिस्तूलप्रकरणी अटक
Published on : 6 June 2023, 3:24 am
चाकण, ता. ६ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथील एकाला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. गणेश रामचंद्र नाणेकर (वय २७), असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. परिसरात ‘गणीभाई’ या नावाने फिरत असतो. त्याच्याकडे सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेचारच्या नाणेकरवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ देशी बनावटीचे पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल विनापरवाना आढळले. याप्रकरणी पोलिस शिपाई रामदास मेरगळ यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिली.