वासुली फाटा येथे १० किलो गांजा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासुली फाटा येथे 
१० किलो गांजा जप्त
वासुली फाटा येथे १० किलो गांजा जप्त

वासुली फाटा येथे १० किलो गांजा जप्त

sakal_logo
By

चाकण, ता. ७ : येथील औद्योगिक वसाहतीतील वासुली फाटा (ता. खेड) येथे भामचंद्र रस्त्याकडेला मंगळवारी (ता. ६) पहाटे थांबलेल्या एकाकडे विक्रीसाठी आणलेला १० किलो १०४ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. त्याला अटक केली आहे. रवींद्र काशिराम राठोड (वय २७, रा. कडूस, ता. खेड), असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी माहिती दिली की, आरोपी राठोड हा नवलाख उंब्रे-मिंडेवाडी (ता. मावळ) येथील विकास बधाले व नगर येथील पठारे यांच्याकडून गांजा घेत होता व त्याची विक्री मावळ व खेड तालुक्यात करत होता. त्याच्याकडून सुमारे दोन लाख ५२ हजार रुपये किमतीचा गांजा व तीस हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. याबाबत पोलिस शरद खैरे यांनी फिर्याद दिली.
याबाबतचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबर व पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी हे करत आहेत.