आंबेठाण येथे तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा

आंबेठाण येथे तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा

Published on

चाकण, ता. १७ : येथील औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता. खेड) येथील एका कंपनी मालकाला आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाने फोन करून ‘मी आमदार दिलीप अण्णा मोहिते बोलतोय’ अशी खोटी बतावणी केली. ‘मला काही सहकार्य होईल का, आता अडचणीत आहे,’ असे म्हणून तोतयागिरी केली. मदतीच्या नावाखाली अथवा काही मालमत्ता मिळविण्यासाठी फसवणुकीचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसात फिर्याद सुमीत मच्छिंद्र मोहिते (वय २७, रा. शेलपिंपळगाव ता. खेड) यांनी दिली. पोलिसांनी एका अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी आरोपीचा मोबाईल क्रमांक कंपनीच्या मालकाच्या मोबाईलवर आलेला आहे. त्या व्यक्तीचा नाव, पत्ता माहीत नाही, त्या अनोळखी व्यक्तीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवारी (ता.१६) दुपारी दोनच्या सुमारास घडला. अनोळखी आरोपीने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून आर्जी प्लास्टिक प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक अश्विन गर्ग यांना फोन केला. ‘मी आमदार दिलीप अण्णा मोहिते बोलतोय’ अशी खोटी बतावणी केली. तोतयागिरी करून मदतीची मागणी केली. फसवणुकीचा प्रयत्न केला, या आरोपीची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com