
पापळवाडीत तीन अपत्यांमुळे गेले ग्रामपंचायत सदस्यत्व
पुणे, ता. ३ : पापळवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य अरुण चिंतामण चव्हाण यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या बाबत मनोहर दशरथ चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल करून पाठपुरावा केला होता.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मनोहर चव्हाण (रा. पापळवाडी) यांनी पापळवाडी ग्रामपंचायत सदस्य अरुण चव्हाण यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करणे या बाबतचा अर्ज दाखल केले होता. हा अर्ज विवादअर्ज म्हणून ग्राह्य धरून सुनावणी झाली. या सुनावणीत अर्जदार मनोहर चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांचा अर्ज ग्राह्य धरून अरुण चव्हाण यांना पापळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले.
या बाबत मनोहर चव्हाण म्हणाले की, शासनाची फसवणूक करून अरुण चव्हाण यांनी पदाचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असून, त्याबाबत संबंधिताला शिक्षा का होवू नये, यासाठीही कोर्टाकडे दाद मागणार आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00103 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..