सोयाबीनच्या पिकातून मिळणार दीड लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीनच्या पिकातून मिळणार दीड लाख
सोयाबीनच्या पिकातून मिळणार दीड लाख

सोयाबीनच्या पिकातून मिळणार दीड लाख

sakal_logo
By

चास, ता.१२ : बुरसेवाडी (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर देवराम पोखरकर यांनी उन्हाळी हंगामात सोयाबिनचे भरघोस उत्पादन घेतले आहे. केवळ ४० गुंठे क्षेत्रातून सरासरी सुमारे दीड ते दोन टन उत्पन्न मिळण्याची विश्‍वास असल्याने त्यांना सुमारे दीड लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतामध्ये विविध पिकांचे प्रयोग करून चांगले उत्पन्न घेण्यासाठी कायमच आघाडीवर असणारे पोखरकर यांनी या वर्षी कृषी विभागाच्या सल्ल्याने सोयाबिनची लागवड केली. त्यांच्याकडूनच बियाणे घेऊन एक एकर क्षेत्रावर मशागत करून शेतामध्ये शेणखत व आवश्यक त्या रासायनिक खतांच्या मात्रा देत सोयाबीन पिकांची हाताच्या साह्याने लागवड केली. केवळ तणनाशक फवारणी करून अन्य कोणत्याही औषधांची फवारणी न करता लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत पीक परिपक्व झाले.

कृषी विभागच करणार मालाची खरेदी
शेतकरी जालिंदर पोखरकर यांना ४० गुंठे क्षेत्रातून सरासरी दीड टन उत्पन्न मिळणार आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. लागवडीसाठी त्यांना कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून आहे. विशेष म्हणजे पिकांची कापणी झाल्यावर कृषी विभागच हमी भावाने पिकांची खरेदी करणार असल्याने शास्वत उत्पन्न मिळणार असल्याचे सकाळशी बोलताना पोखरकर यांनी सांगितले.

पिकाची मशागत, लागवड, खते व मजूरी यासाठी दहा हजार रुपये खर्च आला. पिकावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाला नसल्याने औषधांची फवारणी करण्याची गरजच भासली नाही. पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी व खते दिली आहेत. सद्य स्थितीती पिकांला मोठ्या प्रमाणावर शेंगा लगडल्या आहे. पावसाळ्यापेक्षा पीक जोमदार असून सरासरी दीड टन उत्पन्न अपेक्षात आहे.
-जालिंदर पोखरकर, सोयाबीन उत्पादक

00115

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00107 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top