बुट्टेवाडीत विहीर पुनर्भरण योजनेचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुट्टेवाडीत विहीर पुनर्भरण योजनेचे उद्‌घाटन
बुट्टेवाडीत विहीर पुनर्भरण योजनेचे उद्‌घाटन

बुट्टेवाडीत विहीर पुनर्भरण योजनेचे उद्‌घाटन

sakal_logo
By

चास, ता.१२ : ''''विहीर पुनर्भरण ही काळाची गरज असून, पावसाचे वाहून जाणारे पाणी विहिरीमध्ये उतरवण्यासाठी विहीर पुनर्भरण प्रत्येक शेतकऱ्यांने करणे गरजेचे आहे'''' असे स्पष्ट मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी बुट्टेवाडी (ता. खेड) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
बुट्टेवाडी (ता. खेड) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किसन सखाराम तळेकर यांच्या विहीर पुनर्भरण कामाच्या खोदाईचे उद्‌घाटन करताना बोटे यांच्या हस्ते झाले.
मंडळ कृषी अधिकारी सोमनाथ गावडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, विहीर पुनर्भरणसाठी या योजनेअंतर्गत शासन कमाल १८ हजार रुपये देणार असून, जॉब कार्डधारक मजुरांकरवी हे काम करायचे आहे, सदर योजनेत समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.
यावेळी राजगुरुनगरचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे, तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी, खेडचे मंडळ कृषी अधिकारी सोमनाथ गावडे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण शिंदे, कृषी सहाय्यक दीपाली पवार, बुट्टेवाडी गावचे माजी उपसरपंच नामदेव तळेकर, पोलिस पाटील गणेश तळेकर, कृषी मित्र काशिनाथ तळेकर, कृषी संसाधन व्यक्ती सतीश तळेकर, खेड मंडळातील सर्व कर्मचारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
------------------------
00118

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00110 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top