डेहणे येथे उद्या आदिवासी सामुदायिक विवाहसोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेहणे येथे उद्या आदिवासी 
सामुदायिक विवाहसोहळा
डेहणे येथे उद्या आदिवासी सामुदायिक विवाहसोहळा

डेहणे येथे उद्या आदिवासी सामुदायिक विवाहसोहळा

sakal_logo
By

चास, ता. १३ ः डेहणे (ता. खेड) येथे रविवारी (ता. १५) रोजी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग कन्यादान योजना अंतर्गत व एस. एम. सुपे मेमोरीयल फौंडेशन, पुणे यांच्या वतीने अठरावा भव्य आदिवासी सामुदायिक लग्न सोहळा संप्पन्न होणार असून या सोहळ्यात ११ आदिवासी जोडपी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आयोजक डॅा. संतोष सुपे यांनी दिली.
या वर्षीचा हा सोहळा पाणी आडवा व पाणी जिरवा या मोहिमेसाठी समर्पित होणार असून डेहणे येथील बाजार समितीच्या डॅा. गोविंद गारे सभामंडपात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध गुणदर्शनाचा सोहळा अंतर्गत रावणाची ताटी, बोहाडा नृत्य सादर करण्यात येणार असून सुप्रसिद्ध गायक शरद टिपे यांचा आदिवासी गीतांचा कार्यक्रम त्याच बरोबर ढोल, लेझीम यांसह आदिवासी सांस्कृतिक नृत्यांची मेजवानी ही विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वधू वरांना दोन पोशाख, मंगळसूत्र, जोडवी, बाशिंग देण्यात येणार आहे. सोहळ्याचे संपूर्ण नियोजन डॅा. संतोष सुपे, सरपंच दत्ता खाडे, उपसरपंच शंकर कोरडे, तुकाराम भोकटे, गेणभाऊ वाजे, नामदेव वाजे, बबन नांगरे, बाळू मदगे, दत्तात्रेय लांघी, गोविंद सातपुते, रोहित सुपे, रामदास लांघी हे करणार आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00111 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top