वाडा येथे दोन जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा येथे दोन जनावरांचा मृत्यू
वाडा येथे दोन जनावरांचा मृत्यू

वाडा येथे दोन जनावरांचा मृत्यू

sakal_logo
By

वाडा येथे दोन जनावरांचा मृत्यू
चास, ता. २१ ः वाडा (ता. खेड) येथील पाटील वस्तीवरील शेतकरी नागेश हुंडारे यांचे गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. वीजवाहक तारांच्या घर्षणाने पडलेल्या ठिणग्यांनी गोठ्याला आग लागली.
शनिवार (ता. २१) दुपारी गोठ्यातील पाळीव जनावरे जोरजोरात हंबरू लागल्याने पार्वताबाई हुंडारे यांना आग लागल्याचे समजले. नागेश हुंडारे यांनी पांडुरंग हुंडारे, महेश हुंडारे, बंटी हुंडारे, बाबाजी हुंडारे, नारायण हुंडारे, अभिषेक हुंडारे यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. तोपर्यंत गोठ्यातील गाईने दावे तोडून बाहेर आली मात्र ती शेजारील झुडपात गतप्राण झाली. बैलगाडा शर्यतीचा बैल जागेवरच गतप्राण झाला. शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीची माहिती वाडा मिळताच मंडलाधिकारी शारदा बढे, कोतवाल संदेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00123 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..