भोरगिरीतील दुर्मिळ शिल्पांकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरगिरीतील दुर्मिळ शिल्पांकडे दुर्लक्ष
भोरगिरीतील दुर्मिळ शिल्पांकडे दुर्लक्ष

भोरगिरीतील दुर्मिळ शिल्पांकडे दुर्लक्ष

sakal_logo
By

राजेंद्र लोथे : सकाळ वृत्तसेवा
चास, ता. १४ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भोरगिरी व भोरगड परिसरात दगडांवर कोरीव काम केलेले दुर्मिळ अशी दगडी शिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. या कोरीव शिल्पांचे जतन न केल्याने ते झिजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या दुर्मिळ शिल्पांचे पुरातत्त्व विभागाने वा अन्य मार्गाने जतन करण्याची गरज असून, अन्यथा काळाच्या ओघात ही शिल्पे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या भोरगिरी व भोरगड या गावाला व परिसराला ऐतिहासिक व धार्मिक वसा लाभलेला आहे. या भागात वनवासात असताना पांडवांनी येथे काही दिवस थांबल्याची कथा पुराणात असून, मदमस्त झालेल्या त्रिपुरासुराचा वध महादेव शंकराने याच भूमीत केला, असेही सांगितले जाते.
या परिसरात दुर्मिळ अशी शिल्पे, पांडवकालीन लेणी, गुहा, दगडी पाण्याचे तळे, दगडांवर कोरलेल्या सुंदर मूर्ती, आकर्षक अशी शिवलिंग, नंदी, विविध कलाकुसर केलेल्या दगडी खांबांसह अनेक कलाकृती या भागात असून, गेली कित्येक शतकांपासून त्या ऊन-वारा-पाऊस यामध्ये तग धरून उभ्या आहेत. मात्र, आता या मूर्ती वा शिल्पे झिजून नष्ट होण्याच्या मार्गावर असून, अशी दुर्मिळ शिल्पे पुन्हा तयार करणे शक्य नसल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.
येथील अनेक शिल्पे एका कोपऱ्यात पडलेली असून, त्याच्यावर झाडे-झुडपे, पालापाचोळा जमा झालेला आहे. मातीच्या खालीही काही गाडली गेली आहेत. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टिने विकास करून येथील दुर्मिळ अशा शिल्पांचे जतन केल्यास येथील आदिवासी नागरिकांना रोजगार मिळेल आणि दुर्मिळ अशा शिल्पांचे जतनही होईल.
याबाबत भोरगिरी-भिमाशंकर-भिवेगाव या संयुक्त ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांनी सांगितले की, भोरगिरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्पांचे जतन करणे अशक्य असून, आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या भागात विकासकामे सुरू आहेत. पर्यटनाच्या बाबतीत हा परिसर भिमाशंकर मंदिराला थेट रस्त्याने जोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, ते झाल्यास ही दुर्मिळ शिल्पे जतन होण्यास मदत होणार आहे.

भोरगडातील गुहेत आढळली कळशी
भोरगडावर काही वर्षांपूर्वी एका गुहेत दगडावर कोरलेले शिवलिंग व धातूची मोठी कळशी सापडल्याने या परिसरात भाविकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरूवात झाली. त्यावेळी भिमाशंकर येथील महंत बालयोगी गणेशनाथ महाराज यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले होते की, या भागात कोठेही खोदकाम केले तर शिवलिंग व दगडी कलाकुसर सापडतील.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00150 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top