
दरड कोसळल्याने शिरगावात वाहतूक ठप्प
चास, ता.१२ : मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गावर शिरगांव (ता. खेड ) येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.
पावसाने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील जनजीवन विस्कळित झालेले असतानाच सोमवारी सायंकाळी शिरगांव गावाच्या हद्दीत शिरूर-भीमाशंकर या मार्गावर दरड कोसळली व हा मार्ग ठप्प झाला. घराकडे परतणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने एका बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भीमाशंकर येथील बंदोबस्त करून परतत असताना खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतीष गुरव यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तातडीने जेसीबी मशिन बोलावून रस्ता खुला करण्यास सुरवात केली. सुमारे दोन तासानंतर पुन्हा वाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
--------------------------
00204
Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00186 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..