चास कमानच्या पाच दरवाजातून विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चास कमानच्या पाच दरवाजातून विसर्ग
चास कमानच्या पाच दरवाजातून विसर्ग

चास कमानच्या पाच दरवाजातून विसर्ग

sakal_logo
By

चास, ता.१६ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून शनिवारी (ता. १६) चास कमान धरणाचा पाणीसाठा ९१.०९ टक्यांवर (६. ९३ टीएमसी) वर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे एकूण पाच दरवाज्याव्दारे ४२९५ क्युसेकने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
कालवा आणि नदी मीळून ४९९५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ८.५३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात श्री क्षेत्र भीमाशंकर तसेच भोरगिरी, टोकावडे या भागात पावसाचा जोर कायम असल्याने येथील ओढ्या नाल्यांना पुराची स्थिती आहे व हेच पाणी पुढे चास-कमान धरणात येत असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होते आहे. शनिवार ता. १६ रोजी सकाळी १० वाजता धरणातील पाणीसाठा नव्वद टक्यांच्या पुढे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १०.३० मी. धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडण्यात आले. या पाच दरवाज्याव्दारे ४२९५ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीजनिर्मितीनंत ७०० क्युसेक पाणी कालव्याव्दारे नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने धरणातून एकूण ४९९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असून धरणात आवक ५००० क्युसेक्स आहे.

तीन मेगॅवॅट वीजनिर्मिती सुरू
धरणातून एका तासाला तीन मेगॅवॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मागील वर्षी धरण भरण्यासाठी ४ ऑगष्ट हा दिवस उजाडला होता व ४ ऑगष्टलाच धरणाचे दरवाजे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र चालू वर्षी धरणातील पाणीसाठा शंभर टक्कयाकडे झेपावला असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाची पाचही वक्र दारे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात एक जूनपासून ५१७ मिलीमीटर. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

00212

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00190 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top