संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली
संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली

संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली

sakal_logo
By

चास, ता. २२ ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पडत असणाऱ्या संततधार पावसाने खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था झाली असून पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांची मुळे सडू लागल्याने पिके पिवळी पडू लागली असून खरीप हंगाम हातचा गेल्यासारखी स्थिती आहे.
आधी पावसाने मारलेली दडी व आता संततधार पडणारा पाऊस यामुळे बळीराजाची अवस्था बिकट झाली आहे. खरिपाची पिके यामध्ये सोयाबीन, बाजरी, भुईमूग यासह पिके जोमदारपणे उगवली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने पिकांची दयनीय अवस्था झाली आहे.
शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात पिके पाण्यात बुडून गेल्यासारखी स्थिती असून माळरानाच्या ठिकाणी पिकांमध्ये गवताचे साम्राज्य पसरले आहे. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतांमधूनही नाल्याप्रमाणे पाणी वाहत आहे. जमिनी नापिक होण्याचा धोका वाढला असून आता पावसाने उसंत घेतली तरी खरिपाची पिके पूर्वस्थितीत येण्याची शक्यता कमीच असल्याने खरीप हातचा गेल्यासारखी स्थिती आहे. आता चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने कालव्याच्या गळतीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात निघत असल्याने कालव्यालगतच्या शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही संपुष्टात आल्या आहेत.
या बाबत बोलताना मोहकल येथील माधव रणपिसे, गुलाब राऊत, गुंडाळवाडीचे अरुण गुंडाळ म्हणाले, ‘‘सुरवातीला जेमतेम झालेल्या पावसाने पिके चांगली उगवून आली होती. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार व संततधार पावसाने पिकांची अवस्था दयनीय झाली असून पिके पिवळी पडली असून मुळ्या कुजण्यास सुरूवात झाली आहे. सद्यःस्थितीत पाऊस थांबल्यास पिकांपासून थोडीफार अपेक्षा बाळगता येईल. मात्र, दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पिके पाण्यात राहिल्यास खरीप हंगाम उद्‌ध्वस्त होणार आहे. फक्त भात पिकाला हा पाऊस पोषक असून भात उत्पादक शेतकरी मात्र आनंदात असून भात लागवडी अंतिम टप्यात आल्या आहेत.’३

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00193 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..